उदगीर तालुक्यातील तोंडार येथे ८० जणांना विषबाधा

सामना प्रतिनिधी । लातूर

उदगीर तालुक्यातील मौजे तोंडार येथील ८० जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली. या प्रकरणी ६० जणांवर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करण्यात आले तर २० जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. विषबाधा झालेल्यांना उलट्या होणे, मळमळ होणे असा त्रास होत होता. लग्नातील जेवणामधून ही विषबाधा झाल्याचे म्हटले जात आहे.

उदगीर तालुक्यातील मौजे तोंडार येथे मंगळवारी एक लग्न होते. या लग्नात ग्रामस्थांनी जेवण केले, वऱ्हाडी मंडळी निघून गेली. ग्रामस्थ जेवण करून घराकडे परतले परंतु पोट दुखणे, उलट्या होणे, मळमळ होणे या कारणावरुन एक एक ग्रामस्थ गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल होऊ लागला. प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाNयांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने सर्वांवर उपचार केले. तब्बल ६० जणांनी प्राथमिक आरोग्य वेंâद्रात उपचार घेतले तर २० जणांनी खाजगी रुग्णालयात उपचार घेतले. लग्न समारंभात पाणी पिण्यासाठी जारमधील पाण्याचा वापर करण्यात आलेला होता असे सांगितले गेले, पण नेमके कशामुळे विषबाधा झाली ते कारण मात्र गुलदस्त्यातच राहिले.