
1 ब्रयाचदा एटीएममधून पैसे काढताना घाई गडबडीत डेबिट कार्ड हे एटीएम मधून पैसे काढल्यानंतर ते मशीनमध्येच विसरले जाते. हे अनेक ग्राहकांच्या बाबतीत घडते.
2 जर डेबिट कार्ड एटीएम मशीनमध्ये अडकले किंवा विसरून राहिल्यास घाबरून जाण्याची गरज नाही. शांत राहा. घाबरून जाऊ नका.
3 सर्वात आधी बँकेच्या ग्राहक सेवा केंद्रावर किंवा बँकेच्या शाखेत त्वरित संपर्प साधा. कार्ड हरवल्याची किंवा अडकल्याची तक्रार नोंदवा. कार्ड ब्लॉक करण्याची विनंती करा.
4 बँकेच्या मदतीने तुम्ही नवीन डेबिट कार्ड मिळवण्यासाठी अर्ज दाखल करू शकता. बँकेत तक्रार नोंदवल्याचा पुरावा जपून ठेवा. अर्जानंतर बँकेकडून नवे कार्ड मिळते.
5 एटीएममधून पैसे काढताना तुमच्या आजुबाजुला कोणी आहे का हे पहा. तुमचा पिन कोणालाही सांगू नका. एटीएममधून पैशासोबत कार्ड घ्यायला विसरू नका.

























































