जर्मन बेकरी प्रकरणाचा तपास चुकीचा, माजी पोलीस महानिरीक्षक मुश्रीफ यांचा आरोप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुण्यात 2010 साली झालेल्या जर्मन बेकरी बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने चुकीच्या पद्धतीने केला आहे, असा आरोप माजी पोलीस महानिरीक्षक एस.एम. मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत केला. या प्रकरणाचा फेरतपास करून खऱया अरोपींना अटक करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कोरेगांव पार्प येथील जर्मन बेकरीत बॉम्बस्फोटात 17 लोकांचा मृत्यू झाला. अनेक जण जखमी झाले. या प्रकरणाचा तपास ‘एटीएस’ने केला आहे. हा बॉम्बस्फोट अतिरेकी संघटनेने केल्याचा संशय असल्यामुळे नॅशनल सेक्युरिटी गार्ड, दिल्लीचे कर्नल एच्.एस्. मान व हैद्राबाद येथील फॉरेन्सीक सायन्स लॅबोरेटरीचे डॉ. गोपिनाथ या तज्ञांनी घटनास्थळाला भेट देत महत्त्वाच्या वस्तू जप्त केल्या होत्या.