
शिवसेनेच्या पहिल्यांदा निवडून आलेल्या दोन नगरसेवकांमध्ये समावेश असणारे आणि सामाजिक-शैक्षणिक क्षेत्रात अतुलनीय कामाचा आदर्श निर्माण करणारे दहिसर येथील ज्येष्ठ कार्यकर्ते, माजी नगरसेवक गजानन ठाकरे यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, सून, नातू व दोन बहिणी असा परिवार आहे. महापौर परिषदेचे पहिले अध्यक्ष म्हणून हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना सन्मानित केले होते.
कांदिवली समतानगरपासून दहिसर असा एकच वॉर्ड असताना ते शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावर दिग्गजांवर मात करीत निवडून येत. आता या वॉर्डचे दहा वॉर्ड झाले आहेत. हे सर्व दहा नगरसेवक शिवसेनेला देण्यामध्ये समाजसेवेची आणि राजकारणाची जोड देणारे आदर्शवत राजकारणी अशी त्यांची ओळख होती. गजानन ठाकरे यांची शोकसभा 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 ते 7 या वेळेत विद्याभूषण हायस्कूल, दहिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.