माकप नेते आणि प. बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांचे आज येथे वयाच्या 80 व्या वर्षी निधन झाले. साम्यवादाचे कट्टर पुरस्कर्ते असलेल्या भट्टाचार्य यांनी राज्यात मोठय़ा प्रमाणावर गुंतवणूक आणून औद्योगिक नकाशावर मानाचे स्थान मिळवून दिले होते.
गेले काही महिने ते वृद्धापकाळाशी संबंधित आजारांनी त्रस्त होते. त्यांच्या पश्चात पत्नी मीरा आणि मुलगी सुचेतना असा परिवार आहे. 2022 मध्ये त्यांना जाहीर झालेला पद्मभूषण पुरस्कार स्वीकारण्यास त्यांनी नकार दिला होता. भट्टाचार्यजी यांच्या निधनाबद्दल पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी शोक व्यक्त केला आहे.