
देशभरातील विविध राजकीय पक्षांमध्ये फोडाफोडी करणाऱ्या भारतीय जनता पक्षातच जातकलह उफाळून आला आहे. उत्तर प्रदेशातील 40 ब्राह्मण आमदारांनी नुकतीच वेगळी बैठक घेत शक्तिप्रदर्शन केले. हिवाळी अधिवेशन सुरू असतानाच ही बैठक झाल्याने पक्ष नेतृत्वही हैराण झाले आहे.
भाजपचे कुशीनगरचे आमदार पंचानंद पाठक यांच्या निवासस्थानी ही बैठक झाली. विधानसभेचे व विधानपरिषदेतील ब्राह्मण आमदार बैठकीला उपस्थित होते. आमदार पाठक यांनी बैठकीनंतर ‘एक्स’वर पोस्टही टाकली. ‘ब्राह्मण हा समाजाचा मार्गदर्शक असतो. जिथे ब्राह्मण एकत्र येतात, तिथे ज्ञान, विवेक आणि विचारांचे मंथन होते. हिंदू अस्मिता मजबूत होते,’ असे त्यात नमूद केले. त्यावरून वातावरण अधिकच तापले.
पक्षशिस्त पाळावीच लागेल!
प्रदेशाध्यक्ष पंकज चौधरी यांनी या बैठकीवर नाराजी व्यक्त केली. अशा प्रकारच्या जातीनिहाय बैठका पक्षाच्या घटनेच्या विरोधात आहेत. भाजपमध्ये पक्षशिस्त पाळावीच लागेल,’ असे त्यांनी सुनावले.

































































