टी-20 क्रमवारीत हिंदुस्थानचे वर्चस्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आयसीसीच्या टी-20 फलंदाजांच्या ताज्या क्रमवारीत टीम इंडियाचे चार फलंदाज टॉप-10 मध्ये स्थान मिळविण्यात यशस्वी ठरले आहेत. दरम्यान दक्षिण आफ्रिका संघाचा कॉनर एस्टरहुइजन याने 64 स्थानांची झेप घेत 39 व्या क्रमांकावर मजल मारली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत हार्दिक पंडय़ा दुसऱ्या स्थानी कायम आहे. फलंदाजांच्या क्रमवारीत अभिषेक शर्मा 875 रेटिंगसह अव्वल स्थानी आहे. दुसऱ्या क्रमांकावर ईशान किशन आहे. टॉप-10 मध्ये हिंदुस्थानचे एकूण चार फलंदाज असून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनीही स्थान मिळवले आहे. पाकिस्तानी संघाचा साहिबजादा फरहान तिसऱ्या, तर इंग्लंडचा फिल सॉल्ट चौथ्या स्थानावर आहे.