
रेल्वेच्या आणखी चार वंदे भारत ट्रेन दाखल होणार आहे. या चार वंदे भारतमुळे कर्नाटक, केरळ, पंजाब, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश व दिल्लीतील जनतेला जास्त फायदा होणार आहे. या वंदे भारत ट्रेन केसीआर-बेंगळुर-एर्नाकुलम, फिरोजपूर-दिल्ली कैंट, वाराणसी-खजुराहो, लखनौ-सहारनपूर या मार्गावर धावणार आहेत. रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा दिला आहे.



























































