निवडून आल्यावर भ्रष्टाचार करणार नाही, पक्ष सोडणार नाही

महापालिकेसाठी पुढच्या आठवडय़ात मतदान होणार आहे. राजकीय पक्षांच्या उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. मात्र कोल्हापुरातील महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरलेल्या आम आदमी पक्षाच्या 14 उमेदवारांनी मतदारांसमोर अनोखे शपथपत्र ठेवून महानगरपालिका निवडणुकीत मी निवडून आल्यानंतर भ्रष्टाचार करणार नाही. पक्ष सोडणार नाही, असे 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून दिले आहे. मतदारांचा विश्वास जिंकण्यासाठी उमेदवारांनी लिहिलेल्या या प्रतिज्ञापत्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.