गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक करणारे अटकेत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
Mumbai Crime Delivery Boy Arrested for Theft

गुंतवणुकीच्या नावाखाली व्यावसायिकाची फसवणूक प्रकरणी तिघांना उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. तेजस गायकवाड, दीपक चौधरी, राहुल मेमाणे अशी त्या तिघांची नावे आहेत. त्या तिघांना न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

तक्रारदार हे व्यावसायिक आहेत. फेब्रुवारी महिन्यात त्याना एका व्हाट्सअप ग्रुपमध्ये जोडण्यात आले. त्याच्या पंपनीत गुंतवणूक केल्यास चांगला फायदा मिळेल अशी जाहिरात केली होती. त्या जाहिरातीवर विश्वास ठेऊन त्याने 35 लाख 50 हजार रुपयांची गुंतवणूक केली. त्या गुंतणवुकीवर त्याना चांगला फायदा झाल्याचे दिसले. त्याना ती रक्कम बँक खात्यात ट्रान्स्फर करता येत नव्हती. प्रोसेसिंग फीच्या नावाखाली त्याच्याकडून पैशाची मागणी केली जात होती.

गुंतवणुकीच्या नावाखाली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने उत्तर प्रादेशिक सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी गुन्हा नोंद केला. तांत्रिक माहितीच्या आधारे पोलिसांनी त्या तिघांना ताब्यात घेतले. त्याने विविध बँकेत खाती उघडली होती. बँक खाते उघडून दिल्यावर त्याना काही रक्कम कमिशन म्हणून मिळत होती.