48 तासांत विमान तिकीट रद्द केल्यास पूर्ण रिफंड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी नागरिक उड्डयन महासंचालनालयाने (डीजीसीए) ने विमान प्रवासाच्या तिकिटांच्या परताव्यासाठी आणि तिकीट रद्द करण्यासंबंधीच्या नियमांमध्ये बदल केले आहेत. नव्या नियमानुसार, आता विमान प्रवाशाने तिकीट बुक केल्याच्या 48 तासांच्या आत रद्द केल्यास कोणत्याही अतिरिक्त शुल्काशिवाय तिकीट रद्द होईल. हा निर्णय प्रवाशांच्या वाढत्या तक्रारी आणि अलीकडेच इंडिगोच्या विमानांमध्ये आलेल्या अडचणींनंतर घेण्यात आला आहे.

विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सर्वात मोठा दिलासा ‘शून्य रद्द शुल्क’संदर्भात आहे. आता जर तुम्ही एअर तिकीट बुक केले, तर बुकिंगच्या 48 तासांच्या आत ते रद्द केल्यास किंवा त्यात कोणताही बदल केल्यास एअरलाइन प्रवाशांकडून कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू शकणार नाही, परंतु यासाठी विमान पंपन्यांनी ‘फ्री लुक-इन पीरियड’ची अट घातली आहे.