
तत्काळ तिकीट बुकिंग करणाऱ्या प्रवाशांना दिलासा देणारा मोठा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. आता तत्काळ तिकिटांवरही पूर्ण रिफंड मिळणार आहे. ट्रेन रद्द झाल्यास वा ट्रेनला चार तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रवासी पूर्ण रिफंडसाठी दावा करू शकणार आहेत. दलालांची घुसखोरी रोखण्याचे पाऊल रेल्वेने उचलले आहे. त्यामुळे तत्काळ तिकीट सहज मिळण्याची शक्यता वाढली आहे.
तत्काळ तिकिटाच्या आशेवर राहणाऱया प्रवाशांचा दलालांच्या घुसखोरीमुळे अपेक्षाभंग व्हायचा. काही सेपंदांतच सर्व तिकिटांचा कोटा संपायचा. याच पार्श्वभूमीवर रेल्वेने नियमांमध्ये मोठे बदल केले असून तिकीट बुकिंग सोपे
बनण्याबरोबरच प्रवाशांना ‘कन्फर्म’ तिकीट मिळणार आहे. यापुढे ट्रेन रद्द झाल्यास किंवा ट्रेनला चार तासांपेक्षा अधिक विलंब झाल्यास प्रवाशांना पूर्ण रिफंड मिळणार आहे. काही वेळेला तिकीट बुक केलेल्या ट्रेनचा प्रवास करणे शक्य होत नाही. यापुढे इच्छित ट्रेन चुकल्यासही बुकिंगचे पैसे परत मिळू शकणार आहेत.
एका दिवसात एका खात्यावर दोन तिकिटे
नव्या नियमांनुसार ट्रेन सुटण्याच्या एक दिवस आधी सकाळी 10 वाजता तत्काळ तिकीट बुकिंग सुरू होणार आहे. हे बुकिंग केवळ आयआरसीटीसीच्या अधिपृत खात्यामधूनच करता येईल. त्या खात्याशी ‘आधार’ लिंक करणे अनिवार्य असेल. एका खात्यावरून एका दिवसात दोनच तिकिटे बुक करता येतील. त्यामुळे तिकिटांच्या साठेबाजीतून प्रवाशांची केली जाणारी लूट थांबणार आहे. संशयास्पद खात्यावर अत्याधुनिक फिल्टर व
ट्रकिंग प्रणालीच्या माध्यमातून ‘वॉच’ ठेवण्यात येणार आहे.































































