43 वर्षांपासून गंगा प्रदूषित केली, हरित लवादाचा 22 चर्मोद्योगांना 280 कोटींचा दंड

437

गंगा नदीत कोणती प्रक्रिया न करता दूषित रसायने सोडणाऱया 22 चर्मोद्योगांना राष्ट्रीय हरित लवादाने 280 कोटींचा दंड केला आहे. हे सर्व कारखाने कानपूरमधील रानिया आणि राखी मंडी भागातील आहेत. राज्य सरकारने त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही याबद्दल उत्तर प्रदेश सरकारलाही 10 कोटी रुपयांचा दंड केला आहे.

राष्ट्रीय हरित लवादाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आदर्श कुमार गोयल यांनी हा दंड केला आहे. ‘‘गेल्या 43 वर्षांपासून नदीकाठच्या चर्मोद्योगांमुळे गंगा मोठय़ा प्रमाणात दूषित झाली आहे. हे उद्योग कोणतीही प्रक्रिया न केलेले क्रोमिअम रसायन नदीत सोडत होते. त्यामुळे नदीसह या ठिकाणचे पिण्याचे पाणी आणि एकूणच लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे,’ असे गोयल म्हणाले.

आपली प्रतिक्रिया द्या