लॉकडाऊन काळातही गॅसपुरवठा नियमितपणे सुरू राहणार

388
प्रातिनिधीक फोटो

लॉकडाऊन काळात उज्ज्वला योजनेअंतर्गत 3 महिने गॅस सिलिंडर मोफत देण्याचे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी जाहीर केले आहे.याचा फायदा 8 कोटी कुटुंबाना होणार असल्याचेही त्यांनी सांगितले. या पार्श्वभूमीवर देशामध्ये गॅस सिलिंडरचा तुटवडा जाणवू नये यासाठी केंद्रीय पेट्रोलियममंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तेल विपणन कंपन्यांच्या 700 जिल्हा अधिकाऱ्यांशी संवाद साधला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या संवादादरम्यान केंद्रीय मंत्र्य़ांनी उज्ज्वला योजना ही व्यापक सामाजिक बदलाचा प्रमुख भाग असून कोरोनाविरोधात लढ्यामध्ये ही योजना महत्वपूर्ण योगदान देणारी ठरेल असा विश्वास व्यक्त केला.

प्रधान यांनी सांगितले की देशात पुरेशा प्रमाणात घरगुती गॅस असून त्याचा पुरवठा हा नियमितपणे सुरू राहणार आहे. देशात 15 पोर्ट टर्मिनल, 195 सिंलिंडर भरणा केंद्र आणि सक्षम वाहतूक व्यवस्था असून लॉकडाऊनच्या काळातही हे सेवा अखंडपणे चालू असल्याचेही त्यांनी सांगितेल. दर दिवसाला 60 लाख सिलिंडर घरपोच केले जात असून यासाठी त्यांनी घरपोच सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे विशेष कौतुक केले. जिल्हा अधिकाऱ्यांनी या घरपोच सेवा पोहचवणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची योग्य ती काळजी घ्यावी अशा सूचना प्रधान यांनी दिल्या आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या