पाण्यामुळे नव्हे, कोंबड्या खाल्ल्यामुळे जीबीएस; अजितदादांचे अजब तर्कट

राज्यात अनेक जिल्ह्यांमध्ये गुलेन बॅरी सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचे रुग्ण वाढू लागले आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार होतो असे सांगितले जात होते. पण कोंबड्या खाल्ल्याने हा आजार पसरत असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे.

पुण्यात जीबीएसचे अनेक रुग्ण आढळून येत आहेत. दूषित पाण्यामुळे हा आजार होत असावा असा प्राथमिक अंदाज होता. त्यासाठी पाण्याच्या नमुन्यांची तपासणीही केली गेली. परंतु रुग्ण आढळलेल्या भागातील लोकांनी कोंबड्या खाल्ल्याने हा आजार झाल्याचा दावा केला आहे. अजितदादांच्या या अजब तर्कटामुळे चर्चांना उधाण आले  आहे.

कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही

रुग्ण आढळलेल्या भागातील कोंबड्यांची विल्हेवाट लावण्याची गरज नाही, मात्र कोंबड्यांचे मांस खाणाऱ्यांनी पूर्णपणे शिजवून खावे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला आहे. विभागीय आयुक्तांसह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांना त्या दिशेनेही उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. कोंबड्यांचे अर्धवट शिजवलेले मांस खाल्ल्याने जीबीएस होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे, असे अजित पवार म्हणाले.