लोकहो, लग्न करा… जपान सरकारचे नागरिकांना आवाहन

सतत घटणारा मॅरेज रेट आणि बर्थ रेट सध्या जपान सरकारची मोठी डोकेदुखी ठरली आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी विवाह बंधनात अडकण्यासाठी जपान सरकारने पुढाकार घेतला आहे. येथील सरकार लवकरच Tokyo Futari Story हे मॅरेज अॅप आणि वेबसाईट लॉन्च करणार आहे.

सध्या जपानमधील मॅरेज रेट आतापर्यंतचा सर्वाधिक कमी आहे. 2022 मध्ये जपानमध्ये सुमारे 5 लाख 4 हजार 930 विवाह झाले. वर्ष 2023 मध्ये हा आकडा घटून 4 लाख 74 हजार 717 झाला. जपानमधील नागरिकांना विवाह बंधनात अडकण्यात रस राहिलेला नाही. येथील लोकांना एकटेपणाने ग्रासले आहे. तसेच जपानमधील जन्मदर 7 लाख 70 हजार 759 वरून 7 लाख 27 हजार 277 झाला आहे. त्यामुळे जपानमध्ये मुलांचे पालनपोषण करणे खूपच महाग झाले आहे. तसेच येथील ऑफिसमध्ये काम करण्याचे तास खूपच जास्त असल्याने लोकांना आपल्या कुटुंबासमवेत वेळ घालविणे कठीण झाले. जन्मदर खालावल्याने कामगारांचा तुटवडादेखील जाणवू शकतो.