
मागील काही महिन्यांत बेस्ट बसच्या अपघातांचे प्रमाण वाढले आहे. बुधवारी रात्री पुन्हा बेस्टच्या एका बसला रस्त्यातील खोदकामाचा फटका बसला आणि ती बस खड्डयात अडकली. घाटकोपर-पंतनगर येथील आंबेडकर सर्पल येथे साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सुदैवाने पुणालाही दुखापत झाली नाही. पंतनगर येथील आंबेडकर सर्पल परिसरातील रस्त्याचे काम मुंबई महापालिकेमार्फत केले जात आहे. हे काम करताना रस्त्याच्या अर्ध्या भागातून बसची वाहतूक सुरू ठेवली आहे. याच रस्त्यावरून बेस्टची ए-329 क्रमांकाची शिवाजीनगर आगार ते अंधेरी आगरकर चौक मार्गावर धावणारी बस जात होती. ही बस रस्त्यासाठी खोदलेल्या खड्ड्यात अडकली. रस्ता चुकीच्या पद्धतीने खोदल्यामुळे अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

























































