कांद्याला हमी भाव द्या, खासदार अरविंद सावंत यांची मागणी

कांद्याला हमी भाव द्या अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांनी केली. तसेच शेतकरी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त होत आहे असेही सावंत म्हणाले.

संसदेच्या आवारात माध्यमांशी बोलताना अरविंद सावंत म्हणाले की, शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांचा उत्पादनखर्चदेखील मिळत नाही. दुसरीकडे सरकार पिकांचे उत्पादन आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याबद्दल बोलत आहे. प्रत्यक्षात शेतकरी मोठ्या तोट्याला सामोरे जात आहेत आणि आत्महत्येस प्रवृत्त होत आहेत. त्यामुळे कांद्याला हमी भाव द्या अशी मागणी अरविंद सावंत यांनी केली आहे.