मॅकग्राच्या टॉप फोरमध्ये हिंदुस्थान

 सलग चार वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत खेळणाऱया ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज ग्लेन मॅकग्राने आगामी वर्ल्ड कपमध्ये आपले चार अव्वल संघ निवडले असून यात यजमान हिंदुस्थानचाही समावेश केला आहे. आयसीसी वर्ल्ड कपमध्ये ऑस्ट्रेलियाला तीनदा जगज्जेतेपद मिळवून देणाऱया मॅकग्राने आपल्या संघालाही उपांत्य फेरीत स्थान दिले आहे.

यंदा वर्ल्ड कपचे अंदाज जे संघ वर्तवत आहेत, त्यांच्या संभाव्य यादीत समाविष्ट असलेले चार संघ मॅकग्राच्या संघातही कायम आहेत. त्यानेही जगज्जेता इंग्लंड, यजमान हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान हे चार संघ उपांत्य फेरीत धडक मारतील, असा अंदाज व्यक्त केला आहे. एका वर्तमानपत्राला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, ऑस्ट्रेलियन संघ नक्कीच उपांत्य फेरी गाठेल. हिंदुस्थान आपल्या घरच्या मैदानात खेळणार असल्यामुळे त्याचा फायदा त्यांना उपांत्य फेरी गाठून देईल. इंग्लंड आणि पाकिस्तानचाही संघ चांगला खेळत असल्याचे त्याने सांगितले.