सीता मातेबाबत ट्विटरवर अश्लील पोस्ट, गो एअरने कर्मचाऱ्याची केली हकालपट्टी

1731

देशातील प्रमुख विमान वाहतूक कंपन्यांपैकी एक असलेल्या गो एअरने आपल्या एका कर्मचाऱ्याची हकालपट्टी केली आहे. आसिफ खान असे या कर्मचाऱ्याचे नाव असून त्याने ट्विटरवर सीतामातेबाबत अश्लील पोस्ट केली होती. त्याच्या या पोस्टनंतर ट्विटरवर गोएअरवर बहिष्कार घाला अशा आशयाचा एक ट्रेंड सुरू झाला होता. अनेकांनी गो एअरला ही पोस्ट करणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली होती.

गो एअरमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून कामाला असलेल्या आसिफ खान याने ट्विटरवर सीतामातेसह हिंदू धर्म आणि संस्कृत भाषेबाबत आक्षेपार्ह लिखाण केलं होतं. आसिफ खानच्या या पोस्टनंतर त्याच्या विरोधात संतापाची लाट उसळलीच शिवाय गो एअर विरोधातही लोकांनी बोलायला सुरुवात केली. #BoycottGoAir असा हॅशटॅग सुरू झाला आणि तो गुरुवारी दिवसभर ट्रेंडींगमध्ये होता. या हॅशटॅगचा वापर करून गुरुवारी हजारों ट्विट करण्यात आली होती.

आसिफ खान याच्याविरोधात लोकांनी मोर्चा उघडल्यानंतर त्याने आपले ट्विटर अकाऊंट बंद केलं. मात्र तोपर्यंत अनेकांनी त्याने केलेल्या ट्विटचे फोटो काढून ठेवले होते. आसिफने त्याच्या वैयक्तिक माहितीमध्ये तो गो एअरमध्ये कामाला असल्याचं लिहिलं होतं, ज्यामुळे लोकांनी गो एअरवर देखील आगपाखड करायला सुरुवात केली. या कंपनीने आसिफ खान याची मते वैयक्तिक असून त्याच्या मतांशी गो एअर सहमत नसल्याचं म्हटलंय.

आपली प्रतिक्रिया द्या