
सामना ऑनलाईन, नाशिक
दोन दिवसांपासूनच्या संततधार पावसामुळे गंगापूर, दारणा, नांदूर मधमेश्वर, चणकापूर, पुनंद धरणांचा पाणीसाठा वाढला असून, त्यातून विसर्ग सुरू केला आहे. गंगापूर धरणातून आज ५६८८ क्यूसेक्स पाणी सोडल्याने गोदावरीला मोसमातील पहिला पूर आला. घाटावरील मंदिरे अर्ध्याहून अधिक पाण्याखाली गेली. पाऊस सुरूच असल्याने नदीचे पाणी वाढण्याची चिन्हे आहेत. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. गोदाघाटावर २४३८ क्यूसेक्स पाणी वाहत असून, दुतोंडय़ा मारुतीच्या कमरेपर्यंत पाणी पोहचले आहे. गंगापूर धरणाचा साठा १० टक्क्यांनी वाढून ७५ टक्के झाला आहे.
























































