सोन्याचा भाव वाढला; चांदीचा दर घसरला

सोमवारी सोन्याच्या भावात पुन्हा एकदा वाढ झाली. सोने आज 220 रुपयांनी वाढून 24 कॅरेटचे सोने प्रति तोळा आता 93,734 रुपये झाले आहे, तर चांदीच्या दरात मात्र 407 रुपयांची घसरण झाली आहे. त्यामुळे चांदी प्रति किलो 93 हजार 718 रुपयांवर पोहोचली आहे. 21 एप्रिल रोजी सोन्याचा भाव 99 हजार 100 रुपयांवर होता, तर चांदी 28 मार्चला 1 लाख 934 रुपये प्रति किलोवर पोहोचली होती.