सोने आठवडाभरात तीन हजारांनी घसरले

या आठवड्यात सोन्याची झळाळी थोडी कमी झाली आहे. आठवडाभरात सोन्याच्या किंमतीत 3 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सराफा बाजारात 21 जून रोजी सोन्याची किंमत प्रति तोळा 98 हजार 691 रुपये होती. ती आता 28 जून रोजी 95 हजार 784 रुपये झाली आहे. याचाच अर्थ सोने आठवडाभरात 2 हजार 907 रुपयांनी कमी झाले आहे. सोन्यासोबत चांदीच्या दरातही किरकोळ घसरण झाली आहे. गेल्या शनिवारी चांदीचा दर 1 लाख 6 हजार 775 रुपये होता. तो आता 1 लाख 5 हजार 193 रुपये झाला आहे.