
हिंदुस्थान-पाक युद्धाच्या तणावामुळे सोन्याच्या किमतीत मोठी वाढ झालेली दिसली होती. आता मात्र युद्धविराम झाल्यामुळे सोन्याच्या किमती आठवडय़ाच्या पहिल्याच दिवशी खाली आल्या. अगदी हजारो रुपयांनी गडगडल्या. एमसीएक्स सोन्याचा निर्देशांक रुपये 94,038/10 ग्रॅम होता. दरम्यान एमसीएक्स चांदीची किंमत रुपये 97,900/किलोग्रॅम होती. चांदीच्या किमतीत 1,100 रुपयांनी घट झाली, तर सोन्याची किमत 2480 रुपयांनी कमी झाली. 24 पॅरेट सोन्याचा भाव प्रतितोळा 98680 रुपये होता. तो खाली येऊन 96880 रुपये झाला. 22 पॅरेट सोन्याचा दर काल प्रतितोळा रुपये 90450 होता. तो 88,800 रुपयांवर आला.
अमेरिका आणि चीनमधील ट्रेड करार, तसेच रशियाचा शस्त्रसंधीचा पर्याय व त्यासोबत हिंदुस्थान-पाकिस्तानमधील युद्धविराम यामुळे भू-राजकीय तणाव कमी झाला आहे. याचा थेट परिणाम सोन्याच्या किमतीवर दिसून आला. सोन्याच्या देशांतर्गत आणि जागतिक किमतीत हजारोंची घट झाली.