
एक लाखाचे शिखर सर केलेले सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मागील काही दिवसांपासून सतत घसरण होत आहे. सोमवारी सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांच्या खाली आला, तर चांदीचा भाव प्रतिकिलो 800 रुपयांपेक्षा जास्त घसरला. इंडिया बुलियन ज्वेलर्स असोसिएशनच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार सोमवारी 24 कॅरेट सोन्याचा भाव 400 रुपयांनी घसरून 99,623 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला, जो याआधी 1,00,023 रुपये प्रति 10 ग्रॅम होता. त्याच वेळी 22 कॅरेट 10 ग्रॅम सोन्यासाठी 91,255 रुपये खर्च करावे लागतील, तर 18 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 74,717 रुपयांवर आली आहे.
कारण काय
रशिया-अमेरिका बैठकीमुळे कोणताही निकाल न लागल्याने सोन्याचा भाव स्थिरावला आहे. तसेच पुढील चर्चेतही तोडगा निघाला नाही तर सोन्यावरील दबाव वाढू शकतो. सोन्याचे भाव प्रति 10 ग्रॅम 90,000 ते 1,01,500 रुपयांच्या श्रेणीत राहू शकतात.