टेक कंपनी गुगलने मंगळवारी मध्यरात्री उशिरा मेड बाय गुगल या वार्षिक इव्हेंटमध्ये पिक्सेल-9 सिरीज लाँच केली. या सिरीजमध्ये चार फोन पिक्सेल-9, पिक्सेल-9 प्रो, पिक्सेल-9 एक्सएल आणि पिक्सेल-9 प्रो फोल्ड हे फोन लाँच केले. तसेच पिक्सेल वॉच-3 आणि बड्स प्रो-2 हेसुद्धा लाँच केले. या फोनची सुरुवातीची किंमत 79,999 रुपये आहे. तर फोल्डेबल फोनची किंमत 1 लाख 72 हजार 999 रुपये ठेवली आहे. पिक्सेल वॉच-3ची किंमत 39,990 रुपये, तर पिक्सेल बड्स प्रो-2ची किंमत 22,900 रुपये आहे.