गुगलने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढले

टेक कंपनी गुगलने 100 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. गुगलच्या डिझाइन विभागात ही कर्मचारी कपात करण्यात आली आहे. कंपनीने आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि डिझाइन प्रक्रिया स्वयंचलित करण्यासाठी ही कपात केली आहे. गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी यापूर्वीच संकेत दिले आहेत की, कंपनी एआयला प्राधान्य देण्यासाठी मोठे बदल करेल. गेल्या काही महिन्यांपासून जगभरातील टेक कंपन्या धडाधड कर्मचारी कपात करत आहेत. गेल्या दोन वर्षांत गुगलने 12 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. जानेवारी 2022 मध्ये गुगलने कंपनीतील 12 हजार नोकऱ्या कमी केल्या होत्या. त्यानंतर मे 2024 मध्ये गुगलने कोअर टीममधून 200 नोकऱ्या कमी केल्या. गुगलने सध्या केवळ एआयवर लक्ष्य केंद्रीत केल्यामुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या जात आहेत.