कमला हॅरिस यांना गुगल, नेटफ्लिक्स, लिंक्डइनचा पाठिंबा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक येत्या 5 नोव्हेंबर रोजी आहे. डोनाल्ड ट्रम्प आणि कमला हॅरिस एकमेकांच्या आमनेसामने आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार टक्कर आहे. दोघांचे पारडे कमी-जास्त होताना दिसत आहे. काही दिवसांपूर्वी सिलिकॉन व्हॅलीच्या गुंतवणूकदारांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा दर्शवल्याचे वृत्त होते. त्यानंतर आता राष्ट्राध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांनी टेक सेक्टरमध्ये बाजी मारल्याचे दिसून येतेय. गुगल, नेटफ्लिक्स, लिंक्डइन यांसारख्या टेक जायंट कंपन्यांनी कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला आहे.

अलीकडेच लिंक्डइन सहसंस्थापक रेड हॉफमन यांनी कमला हॅरिस यांना समर्थन दिले. नेटफ्लिक्सचे सहसंस्थापक रिड हेस्टिंग यांनी कमला हॅरिस यांच्या कॅम्पेनसाठी सात लाख अब्ज डॉलरचा निधी दिला.

टेक इंडस्ट्री गेम चेंजर ठरणार

कमला हॅरिस यांच्या कॅम्पेनने जुलै महिन्यात 310 दशलक्ष डॉलरचा निधी उभा केला. सिलिकॉन व्हॅलीमधून त्यांच्या पक्षाला मिळणारा वाढता पाठिंबा निवडणुकीत खूप महत्त्वाचा ठरणार आहे. आधुनिक राजकारणात टेक इंडस्ट्रींची भूमिका महत्त्वाची ठरत आहे. त्यामुळे टेक इंडस्ट्रीतील हाय प्रोफाईल एक्झिक्युटिव व्यक्तींकडून मिळणारे पाठबळ व्हॉईट हाऊसपर्यंतच्या शर्यतीत गेम चेंजर ठरेल.