गोरेगावात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारे भित्तिशिल्प चित्र, सुभाष देसाई यांच्या हस्ते अनावरण

गोरेगावात विद्यार्थ्यांना प्रेरणा देणारी भित्तिशिल्प चित्र उभारण्यात आले आहे. शिक्षण हा एक ध्येयनिष्ठ प्रवास अशी या भित्तिशिल्प चित्राची संकल्पना असून हे शिल्प गोरेगाव पांडुरंग वाडी, मसुराश्रम येथे साकारले आहे. नुकतेच या शिल्पाचे लोकार्पण शिवसेनेच्या वतीने करण्यात आले आहे.

शिल्पकार दिगंबर चिचकार यांनी हे शिल्प 17 बाय 13 या जागेत साकारले आहे. शिवसेना नेते, उद्योग आणि खनिकर्म मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते या भित्तिशिल्प चित्राचे अनावरण करण्यात आले तर हे शिल्प विद्यार्थ्यांना सतत प्रेरणादायी ठरेल अशी भावना सुभाष देसाई यांनी व्यक्त केली. शिवसेना नेते, खासदार गजानन कीर्तिकर आणि विभागप्रमुख-आमदार सुनील प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला. या भागात पांडुरंग वाडी आणि अन्य शाळा असून हे शिल्प पाहिल्यानंतर विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाची प्रेरणा मिळेल, असा विश्वास नगरसेविका साधना माने यांनी व्यक्त केला. या वेळी विधानसभा समन्वयक दीपक सुर्वे, विधानसभा संघटक प्रवीण माईकर, उपविभागप्रमुख सुधाकर देसाई, महिला समन्वयक हेमलता खोमणे, शाखाप्रमुख अजित भोगले, शाखा संघटक शिला राठोड, शशांक कामत, अमोल अपराज, दत्ताराम सावंत, अश्विन माने, रवी वर्मा आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या