बांगलादेशात अराजक; दिल्लीत हालचालींना वेग, सर्वपक्षीय बैठक बोलावली

बांगलादेशात निर्माण झालेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत हालचालींना वेग आला आहे. शेजारील देशातील परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आणि भविष्यातील रणनीती ठरवण्यासाठी केंद्र सरकारने सकाळी 10 वाजता संसद भवनात सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर बांगलादेशातील राजकीय परिस्थितीबाबत माहिती देतील. केंद्र सरकारच्या प्रमुख मंत्र्यांव्यतिरिक्त काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, टीएमसीचे सुदीप बंदोपाध्याय, सपा प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेते सर्वपक्षीय बैठकीत उपस्थित राहणार आहेत.

सर्वपक्षीय बैठकीला केंद्रीय गृहमंत्री आणि संरक्षणमंत्री राहणार उपस्थित

गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू बांगलादेशातील परिस्थितीवर सर्वपक्षीय बैठकीत सरकारचे प्रतिनिधित्व करतील.