
राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी 26 जानेवारीला प्रजासत्ताकदिनी महाराष्ट्राऐवजी गुजरातमध्ये ध्वजवंदन केले. महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज पार्कमध्ये राज्यपालांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकवण्यात आला.
आचार्य देवव्रत यांच्याकडे गुजरातच्या राज्यपाल पदाचा कार्यभार आहे. महाराष्ट्राला पूर्णवेळ राज्यपाल नसल्याने राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार देवव्रत यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांनी ध्वजारोहणासाठी गुजरातला प्राधान्य दिल्याचे सांगितले जाते. प्रजासत्ताकदिनी राज्याच्या राजधानीत मुंबईत राज्यपालांच्या हस्ते ध्वजवंदन केले जाते आणि ते परेडची मानवंदना स्वीकारतात. स्वातंत्र्यदिनी मुख्यमंत्री ध्वजारोहण करतात. यंदा प्रथमच प्रजासत्ताकदिनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले.
Governor Acharya Devvrat Skips Maharashtra Republic Day Event
For the first time in Maharashtra’s history, Governor Acharya Devvrat hoisted the flag in Gujarat instead of Mumbai on Republic Day. CM Devendra Fadnavis led the ceremony.


























































