
दक्षिण मुंबईतल्या चिराबाजार येथील नूतनीकरण करण्यात आलेल्या शिवसेना मध्यवर्ती कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. शिवसैनिकांसह सर्वसामान्यांच्या हक्काच्या कार्यालयामुळे दक्षिण मुंबईतील रहिवाशांच्या समस्येला न्याय मिळणार आहे. शिवसेनेच्या नव्या वास्तुमुळे शिवसैनिकांसह सर्व सामान्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले आहे. त्यामुळेच नवीन कार्यालयाच्या दिमाखदार उद्घाटनप्रसंगी मोठी गर्दी झाली होती.
दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालय वास्तूच्या भव्यदिव्य उद्घाटन सोहळ्यावेळी तुतारी, ढोलपथकाचा गजर आणि ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला’ अशा घोषणांनी येथील परिसर दणाणून गेला. कार्यालयाच्या वर्धापन दिनानिमित्त नूतन वास्तूचे अनावरण पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व रश्मी ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. वर्धापन दिनानिमित्त श्रीसत्यनारायण महापूजादेखील आयोजित करण्यात आली होती तसेच महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ ठेवण्यात आला होता. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, शिवसेना सचिव, आमदार मिलिंद नार्वेकर, शिवसेना उपनेते रवींद्र मिर्लेकर, राजकुमार बाफना, अरुण दुधवडकर, अशोक धात्रक, आमदार सुनील शिंदे, महिला विभाग संघटिका युगंधरा साळेकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, माजी महापौर श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक तसेच विभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आज चिराबाजार येथे दक्षिण मुंबई विभाग क्र.१२ आयोजित दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात पार पडला.
ह्यावेळी पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या शुभहस्ते नूतनीकरण करण्यात आलेल्या, दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयाचे अनावरण करण्यात आले.
दक्षिण… pic.twitter.com/fsMn28Dj6K— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 31, 2025