
बॉक्स ऑफिसवर चमकदार कामगिरी करणारा ‘हाऊसफुल’ सीरिजचा ‘हाऊसफुल 5’ येत्या 6 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. यामध्ये बॉलीवूडची तगडी स्टारकास्ट दिसेल. एक दोन नव्हे तर तब्बल 19 आघाडीचे कलाकार एकत्र दिसतील. हे दिग्गज कलाकार म्हणजे अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, रितेश देशमुख, जॅकलीन फर्नांडिस, सोनम बाजवा, नरगिस फाकरी, संजय दत्त, जॅकी श्रॉफ, नाना पाटेकर, चित्रांगदा सिंग, फरदीन खान, चंकी पांडे, जॉनी लिव्हर, श्रेयस तळपदे, डिनो मोरिया, रणजीत, सौंदर्या शर्मा, निकितीन धीर आणि आकाशदीप सबीर आहेत.



























































