
– ITR फाईल करण्याची अंतिम तारीख 31 जुलै असते. जर ही मुदत चुकली तर तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत ‘बिलेटेड रिटर्न’ फाईल करू शकता.
– अंतिम मुदतीनंतर ITR भरला तर नुकसानही होते. त्याला नुकसानभरपाई (मालमत्ता नुकसान वगळता) पुढील वर्षात कॅरी फॉरवर्ड करता येत नाही.
– पाच लाख रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असलेल्यांना 5,000 रुपये आणि पाच लाखांपर्यंत उत्पन्न असलेल्यांना 1,000 रुपये दंड भरावा लागतो.
– बिलेटेड ITR फाईल करताना कर बाकी असेल तर दंडावर व्याज आकारण्यात येते. कर थकला तर नियम 234 A, 234B आणि 234C अंतर्गत दंडासहीत व्याज द्यावे लागेल.
बिलेटेड रिटर्न भरल्यास रिफंडसाठी ताटकळावे लागेल. टॅक्स रिफंड, व्हेरिफिकेशनची, पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यावर मिळेल.


























































