
महिला व्यावसायिक काम, घरातील कामे, प्रवास आणि इतर असंख्य जबाबदाऱ्यांमुळे स्वतच्या जेवणापेक्षा इतरांच्या जेवणाला प्राधान्य देताना बरेचदा दिसतात. मात्र, प्रथिने आणि फायबर स्नायू आणि उतींच्या देखभालीपासून ते पचन आणि चयापचय आरोग्यापर्यंत या प्रत्येक गोष्टीसाठी आयुष्याच्या सर्व टप्प्यांवर महत्त्वाचे आहेत.
‘द स्टेट ऑफ प्रोटीन अँड फायबर इन अर्बन इंडिया’ हा पेप्सिको इंडियाने युरोमॉनिटर इंटरनॅशनल आणि इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मिलेट रिसर्च यांच्या भागीदारीत केलेला एक अभ्यास आहे. या अभ्यासात असे आढळून आले की, 91 टक्के महिला प्रतिसादकांना प्रथिने नेहमीच्या, रोजच्या जेवणात सहजपणे समाविष्ट करता यावीत असे वाटते. हा फक्त महिलांमधील निष्कर्ष नसून एकंदर सर्वेक्षणाचा निष्कर्ष असला तरी, तो सध्याच्या दिनचर्येत पोषणाचा समावेश करण्याच्या व्यावहारिक मूल्यावर प्रकाश टाकतो. आपल्या रोजच्या आयुष्यात आणखी एक गुंतागुंतीचे काम वाढवणे हा हेतू नसून, आपल्या अन्नाच्या निवडी बदलून अधिक प्रभावी बनवणे हा हेतू असला पाहिजे.
प्रोटीन आणि फायबर योग्य प्रकारे वापरण्याच्या पाच पद्धती
पोषणाचे नियोजन – अंडी, दही किंवा पनीर असलेला नाश्ता उपयुक्त आहे; परंतु दुपारचे जेवण, रात्रीचे जेवण आणि नाश्ता याही गोष्टी तेवढय़ाच महत्त्वाच्या आहेत. शक्य असल्यास प्रथिनांचा स्रोत, भाज्या आणि संपूर्ण धान्याचा समावेश असलेले जेवण तयार करा.
परिपूर्ण जेवणः तुमच्या चुकलेल्या नाश्त्याची भरपाई दुपारच्या संतुलित जेवणाने पूर्णपणे होऊ शकत नाही. साधे पदार्थ उपलब्ध ठेवल्याने, धावपळीच्या दिवसातही नियमितपणे खाणे सोपे होऊ शकते.
नाश्त्याच्या वेळा – खूप काम असेल त्या दिवशी नाश्ता अनेकदा दोन जेवणांमधील अंतर भरून काढण्यास मदत करतो. दही, फळे, भाजलेले चणे आणि सुका मेवा हे व्यावहारिक पर्याय आहेत. तसेच ओट्स आणि सुका मेव्यापासून बनवलेला लाडू किंवा चिक्की आनंददायी ठरू शकतो. आपल्या नाश्त्याची विचारपूर्वक निवड करणे हा आहारात फायबर आणि इतर पोषक तत्त्वे समाविष्ट करण्याचा एक सोपा मार्ग ठरू शकतो.
प्रथिनांसोबत फायबरचेही सेवन करा – भाज्या, डाळी, फळे, ओट्स आणि इतर संपूर्ण धान्ये पचनसंस्थेचे आरोग्य राखण्यास मदत करू शकतात. फायबरयुक्त पदार्थ नाश्त्यातच खाण्याचा प्रयत्न करण्याऐवजी ते वेगवेगळ्या जेवणांमध्ये विभागून घ्या.
शाश्वत पोषण – गर्भधारणा, स्तनपान आणि वृद्धापकाळात पोषणाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. वैद्यकीय परिस्थिती किंवा विशेष आहाराच्या गरजा असतात तिथे वैयक्तिक सल्ला मौल्यवान ठरू शकतो. तात्पर्यः महिलांसाठी शाश्वत पोषणाची सुरुवात अशा छोटय़ा, वारंवार करता येण्याजोग्या निवडींमधून होऊ शकते. त्यामुळे एका परिपूर्ण दिनचर्येची गरज निर्माण न होता प्रथिने आणि फायबर या दोन्हींच्या सेवनास मदत होऊ शकते.
– डॉ. मंजिरी चंद्र, न्यूट्रिशनल मेडिसिन प्रॅक्टिशनर



























































