माझा शब्द आहे तुला, तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार! शेतकऱ्याची कला पाहून प्रविण तरडे भारावले

1541

कोरोनाच्या फटक्यातून शेतकरीसुद्धा सुटलेला नाही, लॉकडाऊनच्या काळात वेळेता सदुपयोग करत कुंडलिक राक्षे या युवा शेतकऱ्याने ‘पॅडी आर्ट’च्या माध्यमातून प्रविण विठ्ठल तरडे लिखीत, दिग्दर्शित आगामी ‘सरसेनापती हंबीरराव’ या ऐतिहासिक मराठी चित्रपटाचे पोस्टर गव्हाच्या शेतात साकारले आहे.

अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली .. याला बहुदा ग्रास…

Posted by Pravin Vitthal Tarde on Wednesday, May 20, 2020

त्याची ही कला पाहून प्रवीण तरडे इतके प्रभावित झाले की, ‘तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार…’ असे आश्वासनच त्यांनी शेतकऱ्याला दिले. धाराशिव जिल्ह्याच्या कळंब तालुक्यात पिंपळगाव या ठिकाणी 90 बाय 45 फूट एवढ्या मोठ्या आकाराची कलाकृती साकारण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे युवा शेतकरी अभयसिंह अडसूळ यांच्या संकल्पनेतून तेथील जिल्हा परिषद शाळेत कलाशिक्षक असलेल्या कुंडलिक राक्षे, तसेच शिवप्रेमी अक्षय पोटे यांनी या पोस्टरला 20 दिवसांच्या परिश्रमातून जिवंत स्वरूप दिले आहे. लॉकडाऊनच्या काळात एक सकारात्मक विचार करून एका युवा शेतकऱ्याने, कलाशिक्षकाने साकारलेले हे पॅडी आर्ट सर्वांसाठी प्रेरणादायी ठरते आहे.

ही कलाकृती पाहिल्यानंतर प्रविण तरडे यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर लिहिले आहे की , ‘अभयसिंह अडसूळ या शेतकरी मित्राच्या संकल्पनेतून कुंडलिक राक्षे या शेतकऱ्याने गव्हाची अशी शेती केली. याला बहुधा ग्रास आर्ट म्हणतात. कुंडलिक मी तुला ओळखत नाही. माझा शब्द आहे तुला , तुझ्या या गव्हाच्या कापणीला मी स्वत: ईळा घेऊन येणार ..’

आपली प्रतिक्रिया द्या