जीएसटी कलेक्शन 1.78 लाख कोटीवर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मार्च 2026 मध्ये जीएसटी कलेक्शन 1.78 लाख कोटींवर पोहोचले आहे. 1 एप्रिल 2026 ला जारी करण्यात आलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, मार्चमध्ये केंद्र आणि राज्य सरकारने रिफंड घटवल्यानंतर नेट जीएसटी रेव्हेन्यू 1.78 लाख कोटी रुपये जमा केले. हे मागील वर्षीच्या तुलनेत 8.2 टक्के जास्त आहे. सप्टेंबर 2025 मध्ये टॅक्स कपातीनंतर हे कलेक्शन चांगले आहे. ग्रॉस डोमेस्टिक रेव्हेन्यू (सीजीएसटी, एसजीएसटी, आयजीएसटी) 1.46 लाख कोटी रुपये आहे.