Independence Day भाजप खासदार ध्वजारोहण करत असता तिरंगा आला खाली, नेटकरी संतापले

देशात 78 वा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव उत्साहात सुरू आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात तिरंगा फडकावून त्याला मानवंदना दिली जात आहे. मात्र भाजपच्या एका खासदाराकडून तिरंगा फडकवत असताना अपमान झाला आहे.

उत्तर प्रदेशातील हापूर येथे ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात आला होता. या समारोहासाठी भाजप खासदार अरुण गोविल उपस्थित होते. त्यांनी ध्वज फडकवण्यास सुरुवात केली तेव्हा दोरी अडकली आणि ध्वजारोहण सुरू असताना ध्वज खाली आला.