
इंग्लंडच्या दौऱयावर कुलदीप यादवला केवळ पिकनिकसाठी घेऊन गेल्यासारखे वाटू लागलेय. संघात स्थान मिळवण्यासाठी धडपडत असलेल्या कुलदीपला शेवटच्या दोन कसोटींतही स्थान मिळण्याची शक्यता धूसरच आहे. मात्र आता हरभजन सिंगने त्याच्या संघनिवडीसाठी थेट प्रशिक्षक गौतम गंभीरला सल्ला दिलाय की नितीशकुमार रेड्डीला थेट संघाबाहेर बसवा. आता हरभजनचा हा सल्ला गौतम किती गंभीरपणे घेतोय, या विषयसुद्धा संशोधनाचाच आहे.
हरभजनने लॉर्ड्स कसोटीच्या आधीसुद्धा आणि बार्ंमगहॅम कसोटीपूर्वीही कुलदीपला संघात घ्यावे अशी मागणी केली होती. या दोन्ही कसोटींत त्याला संधी मिळायलाच हवी असे हरभजनने सांगितले होते.