चुलीची आग भडकली अन् 40हून अधिक घरे जळाली, 24 जनावरांचा होरपळून मृत्यू

उत्तरप्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील एका गावात आग लागल्याची घटना घडली आहे. घरात लावलेल्या चुलीतील आग भडकली आणि आगीने रौद्र रुप धारण केले. त्यात संपूर्ण गाव जळून राख झाले. या दुर्घटनेत 40हून अधिक घरे जळाली तर 24 जनावरांनी होरपळून मृत्यू झाला.

घटनेची माहिती अग्निशमन दलाला देणयात आली मात्र रस्त्यात जागोजागी झाडे पडल्याने अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचू शकले नाही. ग्रामस्थांनी पंपाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र आग भीषण असल्याने संपूर्ण गाव आगीच्या विळख्यात आले. खाण्या पिण्याच्या वस्तू आणि घरातील सामान राख झाल्याने लोकांचे खाण्याचेही प्रचंड हाल झाले.

घटनेची माहिची मिळताच क्षणी राजस्व विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. अधिकारी घटनास्थळी पोहोचले. गावकऱ्यांनी त्यांच्यासमोरप आक्रोश व्यक्त केला. त्यांच्या म्हणण्यानुसार, वेळीच उपाययोजना झाल्या असत्या तर गावकऱ्यांचे एवढे नुकसान झाले नसते. संपूर्ण गावात ठाणे अध्यक्षच्या म्हणण्यानुसार, ग्रामस्थांनी शक्य तेवढी मदत केली जात आहे.