दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन झाला वाद, दुसऱ्याने केले भयंकर कृत्य

उत्तराखंडच्या बहादराबादमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दोन मित्रांमध्ये 1200 रुपयांवरुन वाद झाला. वाद विकोपास जाऊन मित्रानेच मित्राची हत्या केली. पोलिसांनी अवघ्या काही तासातच आरोपीला अटक केली आहे. न्यायालयात उभे केले असता त्याला तुरुंगात पाठवण्यात आले.

बहादराबाद येथील रोहीत आणि सौरभ अशी मित्रांची नावे आहेत. सौरभसोबत रोहीत बाईकने दारुच्या गुत्त्यावर गेला होता. तिथे दोघांमध्ये 1200 रुपयांवरुन वाद झाला. त्यात सौरभने रोहीतच्या कानाखाली मारली. ज्यामुळे सौरभ संतापला. बदला घेण्यासाठी त्याने चाकूने त्याच्यावर हल्ला केला आणि तो फरार झाला. ज्यात सौरभ गंभीर जखमी झाला. त्याला हरिद्वारच्या एम्स ऋषिकेशला नेले असता उपाचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बहादराबादचे पोलीस ठाण्याचे अध्यक्ष अंकुर शर्मा यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने शोध सुरु केला. त्यानंतर 24 तासाच्या आत पथरी हाऊसजवळ आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याने वापरलेल्या चाकूवर त्याच्या हाताचे ठसे सापडले आहे. त्याची कसून चौकशी केली असता त्याने त्याचा गुन्हा कबूल केला आहे. त्याला न्यायालयात उभे केले असता तुरुंगात पाठवण्यात आले आहे.