मुलतानमध्ये सुरू असलेल्या कसोटी लढती इंग्लंडने पाकिस्तानी गोलंदाजांची तुफान धुलाई करत 823 धावांचा डोंगर उभारला. इंग्लंडकडून हॅरी ब्रूक याने बेसबॉल क्रिकेट खेळत त्रिशतक झळकावले आणि नवीन इतिहास घडवला. ब्रूकने 322 चेंडूत 29 चौकार आणि 3 षटकारांची आतषबाजी करत 317 धावा चोपल्या.
याच मैदानावर टीम इंडियाचा माजी खेळाडू वीरेंद्र सेहवाग याने 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक ठोकले होते आणि ‘मुलतानचा सुलतान’ हे बिरूद मिरवले. सेहवागच्याच स्टाईलमध्ये हॅरी ब्रूक याने चौकार ठोकत त्रिशतकाला गवसणी घातली. कसोटी क्रिकेटमध्ये इंग्लंडकडून त्रिशतक ठोकणारा सहावा खेळाडू ठरला आहे.
Simply incredible 🙌
Our sixth Test triple centurion 👏
Match Centre: https://t.co/M5mJLlHALN
🇵🇰 #PAKvENG 🏴 | #EnglandCricket pic.twitter.com/TtlIKWdbhs
— England Cricket (@englandcricket) October 10, 2024
हॅरी ब्रूक पाकिस्तानविरुद्ध त्रिशतक ठोकणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. याआधी वेस्ट इंडिजच्या गॅरी सोबर्स यांनी 1958 ला नाबाद 365 धावांची खेळी केली होती, 2019 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या वॉर्नरने नाबाद 335 धावा, ऑस्ट्रेलियाच्या मार्क टेलरने 1998 ला नाबाद 324 धावा आणि हिंदुस्थानच्या वीरेंद्र सेहवागने 2004 मध्ये 309 धावांची खेळी केली होती.
सेहवागने मुल्तानमध्ये 364 धावांमध्ये त्रिशतक ठोकले होते. या खेळीदरम्यान त्याने 39 चौकार आणि 6 षटकार ठोकले होते. दुसरीकडे हॅरी ब्रूक याने त्रिशतक ठोकण्यासाठी 310 चेंडूत घेतले आणि सेहवागचा विक्रम मोडला. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेगवान त्रिशतक ठोकण्याचा विक्रम आजही सेहवागच्या नावावर असून त्याने 2008-09 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 278 धावांमध्ये हा कारनामा केला होता.
कसोटीत एका डावातील सर्वोच्च धावसंख्या
– श्रीलंकेने 1997 ला हिंदुस्थानविरुद्ध कोलंबो कसोटीत 6 बाद 952 धावा केल्या होत्या.
– इंग्लंडने 1938 मध्ये ओव्हल मैदानावर ऑस्ट्रेलियाविरुद्ध 7 बाद 903 धावा केल्या होत्या.
– इंग्लंडने 1930 ला वेस्ट इंडिजविरुद्ध किंग्स्टन कसोटीत 849 धावा केल्या होत्या.
– इंग्लंडने मुलतानमध्ये पाकिस्तानविरुद्ध 3 बाद 823 धावा केल्या.