
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘करो या मरो’चा मंत्र देत जुलमी इंग्रजांना ‘चले जाव’चा नारा दिला. आज देशात तीच परिस्थिती आहे, लोकशाही व संविधान गिळंकृत करणाऱ्या प्रवृत्तीच्या विरोधात चले जावचा नारा देण्याची गरज आहे, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी आज व्यक्त केली.
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त काँग्रेसने गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत पदयात्रा काढली. त्यानंतर हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, आज महात्मा गांधींचा संदेश व देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले याची आठवण सर्वांना झाली पाहिजे. मोठय़ा संघर्षानंतर आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. पण आज देशातील परिस्थिती पाहता पुन्हा एकदा ‘चले जाव’चा नारा देण्याची गरज असून देशात आज एका नव्या क्रांतीची गरज आहे.