एचडीएफसीचा झटका

hdfc-bank

एचडीएफसी बँकेने पुन्हा एकदा फिक्स्ड डिपॉझिट (एफडी) मधील व्याजदरात कपात केली आहे. एचडीएफसी बँकेने 25 जुलै 2025 पासून हा नियम लागू केला आहे. बँकेने जुलै महिन्यात सलग दुसऱ्यांदा व्याजदरात कपात केली आहे. या निर्णयाचा फटका सर्वसामान्य ग्राहकांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनाच बसणार आहे. 15 महिन्यांपेक्षा कमी आणि 18 महिन्यांपेक्षा जास्तीच्या एफडी व्याजदरात 0.25 टक्के कपात करण्यात आली आहे. एफडीवर 6.60 टक्क्यांवरून आता 6.35 टक्के व्याज मिळणार आहे, तर ज्येष्ठ नागरिकांना 7.10 टक्क्यांऐवजी 6.85 टक्के व्याज मिळणार आहे.