एचडीएफसी बँकेचा ग्राहकांना अलर्ट जारी

एचडीएफसी बँकेने आपल्या ग्राहकांना एक अलर्ट जारी केला आहे. या अलर्टनुसार, बँकेच्या काही कस्टमर सेवा 22 ऑगस्टच्या रात्री 11 वाजेपासून 23 ऑगस्टच्या सकाळी 6 वाजेपर्यंत म्हणजेच जवळपास 7 तास बंद राहणार आहे. यादरम्यान, ग्राहकांसाठी व्हॉट्सअ‍ॅप चॅट बँकिंग, एसएमएस बँकिंग, फोन बँकिंग आयव्हीआर, ई-मेल आणि सोशल मीडिया सपोर्ट बंद राहणार आहे. बँकेची सिस्टीम अपग्रेड करण्यासाठी आणि ग्राहकांचा अनुभव आणखी चांगला करण्यासाठी हे सर्व केले जात आहे.