
चांदीचे दागिने हे फार पूर्वीपासून घालण्याची प्रथा आहे. चांदीचे केवळ दागिनेच नाही तर, अन्नपदार्थ खाण्यासाठी चांदीच्या भांड्यांचा उपयोग हा पूर्वापार केला जात आहे. चांदी ही आपल्या आरोग्यासाठी फार उत्तम मानली जाते. चांदीचे दागिने केवळ सौंदर्य खुलवण्यासाठी नाही तर, आपल्या आरोग्यासाठी सुद्धा फार महत्त्वाचे मानले जातात. आजही अनेक महिला आणि मुली चांदीचे पैंजण पायात आवर्जून घालतात.
चांदीचे पैंजण हे आपल्या लूकमध्ये एक वेगळाच बदल घडवून आणतात. पायात चांदीचे पैंजण घालण्याचे खूप फायदे आहेत. पैंजणमुळे केवळ आपले सौंदर्य खुलत नाही तर, आपले आरोग्यही उत्तम राहते. पैंजण घातल्याने अॅक्युप्रेशर पॉइंट्स दाबले जातात. यामुळे आरोग्याला फायदा होतो. चांदीचे गुणधर्म आपल्याला मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त ठेवतात.
पायात चांदीचे पैंजण घालण्याचे फायदे
महिलांमध्ये पाय दुखण्याचे प्रमाण फार मोठ्या प्रमाणात असते. अशावेळी पायामध्ये चांदीचे पैंजण घातल्याने, वेदनेपासून आराम मिळतो.
Health Tips – रिकाम्या पोटी लिंबू पाणी पिताय का, मग या महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या
उंच टाचांच्या पादत्राणांमुळे कधीकधी टाचांना सूज येते. यामुळे पायात खूप वेदना होतात. बोटांमध्ये वेदना होतात. पण चांदीचे पैंजण घातल्यामुळे, पायाला येणारी सूज ही कमी होते. यामुळे आपल्या पायाच्या दिशेने होणारे रक्ताभिसरण सुधारते.
पायात पैंजण घातल्यामुळे, आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. यामुळे लिम्फ ग्रंथी सक्रिय होतात. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती तुम्हाला अनेक रोगांशी लढण्यास मदत करते.
Hair Care – पावसाळ्यात केसांना किती प्रमाणात तेल लावायला हवे? वाचा
अनेक महिला हार्मोनल असंतुलनामुळे त्रस्त असतात. यामुळे वंध्यत्व आणि अनियमित मासिक पाळी यासारख्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. अशा परिस्थितीत चांदीचे पैंजण घालणे खूप फायदेशीर ठरते. यामुळे हार्मोन्स संतुलित होण्यास मदत मिळते.
चांदीचे पैंजण घातल्याने, शरीराचे तापमान संतुलित राहण्यास मदत होते.
पैंजण घातल्याने आपल्या पायांचे अॅक्युप्रेशर पाॅईंटवर दाब पडतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारते.