
रिसमप्युअर या हेल्थकेअर विभागामध्ये ४ दशकांहून अधिक काळाचा अनुभव असलेली आघाडीची हेल्थकेअर कंपनी भारत सीरम्स अॅण्ड व्हॅक्सिन्स लि. (बीएसव्हीएल) च्या माजी प्रवतर्कांच्या मालकीहक्काच्या कंपनीने एअर प्युरिफायर्सची श्रेणी अॅटमोप्युअर लाँच केली आहे. भारतामध्ये सर्वोत्तम हेल्थकेअर व स्वास्थ्य उत्पादने देण्याचा मनसुबा असलेली रिसमप्युअर™ दोन व्हेरिएण्ट्स सादर करणार आहे –मेडिकल ग्रेड हेपा 14 रेंज आणि अॅडवान्स्ड ग्रेड हेपा 13 रेंज. एअर प्युरिफायर्स ग्राहकांसाठी 14990 रूपये किंमतीपासून उपलब्ध असतील.
अॅटमोप्युअर एअर प्युरिफायर्स तुम्ही श्वास घेत असलेल्या हवेमध्ये कोणत्याही प्रकारचे हवानिर्मित आजारांचे विषाणू नसण्याची खात्री देत तुमच्या आरोग्याचे सक्रियपणे संरक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आले आहेत. अॅटमोप्युअर एअर प्युरिफायर्स आतमध्ये असलेल्या स्टेट ऑफ दि आर्ट 5 स्टेज प्युरिफिकेशन सिस्टिमच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या हवानिर्मित विषाणूंचे निर्मूलन करते. या प्युरिफायर्समध्ये बिल्ट-इन प्री-फिल्टर + अॅक्टिव्हेटेड कार्बन फिल्टर + ‘3डी अॅटॅक’ टेक्नोलॉजी आहे.
आमची नवोन्मेष्कारी व क्रांतिकारी ‘3डी अॅटॅक’ टेक्नोलॉजी तुमच्या घरातील प्रत्येक कोप-यामधील हवा सर्व प्रकारचे अॅलर्जीन्स, जीवाणू व विषाणूंपासून मुक्त असण्याच्या खात्रीसाठी डिझाइन करण्यात आली आहे. ‘३डी अॅटॅक’ टेक्नोलॉजीमध्ये ३ शक्तिशाली तंत्रज्ञाने आहेत – मेडिकल ग्रेड हेपा 14 + यूव्ही-सी + आयनोझर. ज्यामुळे यामध्ये केस व धूळ, गॅस, दुर्गंधी, व्हीओसी,परागकण, मूस, अॅलर्जी, बुरशी, फंगी, जीवाणू आणि विषाणू सारखे सर्व हवा-निर्मित कण (0.3 मायक्रोन्स इतके लहान) दूर करण्यासाठी अद्वितीय संयोजन आहे.
पाचही तंत्रज्ञाने अॅटमोप्युअर एअर प्युरिफायर्सला तुमच्या घरांसाठी अद्वितीय व शक्तिशाली बनवतात.
”दिवसेंदिवस वायू प्रदूषणामध्ये वाढ होत आहे आणि आपण आपल्या घरामध्ये देखील दूषित हवेचा सतत श्वास घेत आहोत, ज्याबाबत आपल्याला समजत देखील नाही. अॅटमोप्युअर अत्याधुनिक एअर प्युरिफायर्सचे लाँच आरोग्यदायी देश निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतामध्ये सर्वोत्तम हेल्थकेअर व स्वास्थ्य उत्पादने सादर करण्याच्या आमच्या दृष्टीकोनाच्या दिशेने पाऊल आहे,” असे भारत सीरम्स अॅण्ड व्हॅक्सिन्स लि.चे माजी अध्यक्ष श्री. भरत दफ्तरी म्हणाले.
अधिक पुढे जात कंपनीची अधिक नवोन्मेष्कारी हेल्थकेअर सोल्यूशन्स सादर करण्यासाठी व्यापक संशोधन करण्याची योजना आहे. रिसमप्युअरचा बी२बी व इतर विभागांवर लक्ष्य करत प्युरिफिकेशन श्रेणीमध्ये अधिक उत्पादने सादर करण्याच्या माध्यमातून आपला पोर्टफोलिओ वाढवण्याचा मनसुबा आहे. आमच्या उत्पादन पोर्टफोलिओ धोरणाचा मूळ पाया प्युरिटी (शुद्धता) आहे आणि आम्ही सादर व लाँच करणा-या प्रत्येक उत्पादनामध्ये हे दिसून येईल.
रिसमप्युअरचे व्यावसायिक संचालक वैकुंठ गणपती म्हणाले,”आमच्या लोगोमधील लीफ या शुद्धतेचे प्रतीक आहे. यामधून आमचा विश्वास व धोरण एकत्रितपणे दिसून येतात. ग्राहक त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि त्यांची एकूण जीवनशैली अपग्रेड करण्यासाठी आरोग्यदायी निवडी करत आहेत. धूळ, प्रदूषकांचे वाढते प्रमाण आणि हरित आच्छादनाचे कमी होत असलेल्या प्रमाणामुळे हवेचा दर्जा लक्षणीयरित्या खालावलेला आहे आणि ग्राहक एअर प्युरिफायर्स सारख्या अधिक आरोग्य-केंद्रित सोल्यूशन्सना प्राधान्य देत आहेत. अॅटमोप्युअर एअर प्युरिफायर्समध्ये उच्च प्रगत तंत्रज्ञानांचा समावेश आहे, जे तुम्ही घर व कार्यालयांमध्ये श्वास घेत असलेली हवा सुरक्षित व शुद्ध असण्याची खात्री देतात.”