लाखांदुर येथे वादळी वाऱ्यासह पाऊस; दुकानावरील टीनपत्रे उडाली

भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर तालुक्यात येथे रात्रीच्या दरम्यान वादळी वाऱ्यासह पाऊस आल्याने एका कापड दुकानावरील टिनपत्रे हवेत उडाले. मात्र रस्त्यावर वर्दळ नसल्याने कोणतीच हानी झाली नाही.तर बाजार समिती मधील टिन पत्रे उडाली आहेत.वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने बाजार समितीच्या आवारात हजारो ठेवलेली धानाची पोते ओले झाले असून श्रीकांत बावनकुळे यांच्या धानाच्या पोत्यावर दोन मोठी झाडे पडल्याने मोठी नुकसान झाले आहे.अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी सुकण्यासाठी टाकलेले धान ओले झाले आहेत.अचानक आकाशात ढगाळ वातावरण निर्माण होऊन ढगांचा गडगडाट व जोरदार विजा चमकू लागल्या.रात्रीच्या सुमारास सुरू झालेल्या या वादळी पावसामुळे बाजार समितीत हजारो धानाची पोती ओल्या झाल्या तर श्रीकांत बावनकुळे यांचे पाच हजार धानाची पोती उघड्यावर असल्याने पावसाने ओली झाली.