कुडाळ तालुक्यात मुसळधार: जनजीवन विस्कळीत; 30 गावांचा संपर्क तुटला

114

सामना प्रतिनिधी । कुडाळ

सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेले दोन दिवस पावसाचा जोर वाढला आहे. कुडाळ तालुक्यातील कोसळत असलेल्या धुवाँधार पावसाने गुरूवारी जनजीवन विस्कळीत झाले. नदी, नाले दुथडी भरून वाहत आहेत. माणगांव खो-यातील दुकानवाड, उपवडे, वसोली भागातील कॉजवे रात्रीपासून पाण्याखाली गेले. आंबेरी पुलावर पाणी आल्याने माणगांव खो-यातील 25 ते 30 गावांचा संपर्क तुटला. एस.टी बससह खासगी वाहने दोन्ही बाजूला सुमारे सात तास अडकून पडली. शालेय मुलांची प्रचंड गैरसोय झाली.

कुडाळ भंगसाळ (कर्ली) नदीला पूरस्थिती प्राप्त होऊन कुडाळ, कविलकाटे, बांव, पावशी, वेताळबांबर्डे, पणदूर, चेंदवण, सरंबळ या भागात शेतमळ्यांमध्ये पाणी साचून शेतीचे नुकसान झाले. कुडाळ शहरात गुलमोहोर जवळ रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली. तालुक्यात पावसाचा जोर कायम आहे.

आपली प्रतिक्रिया द्या