मुंबईत मुसळधार पावसाचा कहर, ठिकठिकाणी साचले पाणी; लोकल आणि विमान सेवेलाही जोरदार फटका

आज मंगळवारीही मुंबईत पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईत पाणी साचले असून त्यामुळे रेल्वे आणि विमान सेवेला जोरदार फटका बसला आहे.

मंगळवारी सकाळी अखंड पडलेल्या रात्रीच्या पावसामुळे मुंबई ठप्प झाली असून शहराच्या मोठ्या भागांत पाणी साचले आहे. भारत हवामान खात्याने (IMD) मुंबईसह रायगड, रत्नागिरी, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला असून मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबई महापालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व खासगी कार्यालये आणि आस्थापनांना आज सुट्टी जाहीर केली आहे. मात्र, आवश्यक आणि आपत्कालीन सेवांना यामध्ये अपवाद ठेवण्यात आला आहे. संबंधित कार्यालये व आस्थापनांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार ‘वर्क फ्रॉम होम’ करण्याचे निर्देश तातडीने द्यावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईच्या पश्चिम उपनगरांतील विविध भागांत मुसळधार पावसामुळे पाणी साचले आहे. वांद्रे खार लिंक रोडवरील वाहने पाण्यातून वाट काढताना दिसून आली.

मुंबई पोलिस आयुक्तांनी ‘एक्स’वर शहरातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सूचना दिल्या. कृपया काळजी घ्या, केवळ अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडा, भरतीच्या वेळी समुद्रकिनारी जाणे टाळा आणि लक्षात ठेवा, कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीत आम्ही मदतीसाठी तत्पर आहोत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले. तसेच, खाजगी क्षेत्रातील कार्यालयांनी आपल्या कर्मचाऱ्यांना आज ‘वर्क फ्रॉम होम’ची सुविधा द्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Similar conditions were reported from Dadar TT, Trombay, Maharashtra Nagar Subway, and Antop Hill, as well as MG Road Chowk, Kanekar Nagar, Sardar Nagar, and Pratiksha Nagar. Here too, continuous rainfall since morning led to water accumulation of up to two feet, slowing down vehicular movement.

दादर टीटी, ट्रॉम्बे, महाराष्ट्र नगर सबवे, अँटॉप हिल, एम.जी. रोड चौक, कानकर नगर, सरदार नगर आणि प्रतीक्षा नगर या भागांतही मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे येथे सुमारे दोन फूट पाणी साचले असून वाहनांची हालचाल मंदावली आहे.

गोल देऊळ, गुलालवाडी, वडाळा, शिवडी, नवाब टाकी, नागपाडा, मराठा मंदिर, भायखळा, बावला कंपाऊंड, भोईवाडा, वडाळा स्टेशन फोर रोड्स, हिंदमाता जंक्शन, माटुंगा आणि महात्मा गांधी मार्केट या भागांत अतिशय गंभीर परिस्थिती असून रस्ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहनांना हालचाल करणे कठीण झाले आहे.

सकाळी मुसळधार पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील अनेक ठिकाणी पाणी साचले. अंधेरी परिसरातही अनेक भागांत पाणी साचल्यामुळे नागरिक आणि वाहने पाण्यातून वाट काढताना दिसली.

परळ भागात शिरोडकर मार्केटमध्ये पाणी साचले होते. तेव्हा पोलिसांनी नागरिकांना जाण्यासाठी मदत केली.